सरसकट पिक विमा मिळावा यासाठीशेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
परभणी: जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळात कापणी पश्चात तूर हरभरा पिकास सरसकट पिक विमा देणे व व इतर पिकांचे विमा तात्काळ वाटप करण्यासंदर्भात सात ऑगस्ट रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आली आहे की जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील शेतकरी कापणे प्रयोग पश्चात तूर हरभऱ्यास सरसकट पिक विमा देण्यात यावे आणि कापूस ज्वारी सोयाबीन व इतर पिकांच्या तक्रारदार शेतकऱ्यांस आज पर्यंत पिक विमा भेटलेला नाही आजही अनेक शेतकरी पिक विमा च्या लाभ्यापासून वंचित आहेत त्यांची तात्काळ त्रुटी यादी जाहीर करून काही त्रुटी असल्यास त्रुटीची पूर्तता करून तात्काळ पिक विमा वाटप करण्यात यावी. मागणी मान्य न झाल्यास 23 ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने भजन कीर्तन आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे. सदर निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे इर्शाद पाशा चांद पाशा, नारायणराव मस्के, चंद्रकांत देशमुख शिवानंद मुटकुळे, नाना राऊत, अभिलाष राऊत ,गजानन पोंदाळे, राजेंद्र कराळे यांच्यासह अनेक शेतकर्यांचा स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी