राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून अॅडवोकेट प्रकाश संसारे यांना उमेदवारी द्यावी- राहुरी बार असोशियनची मागणी.
राहुरी कोर्टामध्ये गेल्या 27 वर्षापासून वकिली व्यवसाय व नोटरी पब्लिक म्हणून काम करणारे एडवोकेट प्रकाश संसारे यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राखीव श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी राहुरी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भानुदास नवले यांनी केली आहे.
एडवोकेट संसारे यांनी आपला वकिली व्यवसाय करताना अनेक गोरगरिबांची खटके मोफत लढविले असून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे ते मूळचे देवळाली प्रवरा येथील रहिवासी असून 32 गावातील नागरिकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे ही त्यांची जमेची बाजू आहे तसेच ते या मतदार संघातील स्थानिक असल्याने त्यांना निवडणुकीमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल त्याचप्रमाणे भीमशक्ती चे अध्यक्ष खासदार चंद्रकांत दिंडोरी व विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब साठे यांचे नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस म्हणून संसार यांनी केलेली काम उल्लेखनीय आहे त्यामुळे श्रीरामपूर राखीव मतदार संघातून अडवोकेट प्रकाश संसारे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
(जालिंदर ढोकणे राहुरी)