महादेव कोळी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन.
परभणी जिल्ह्यातील बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी च्या वतीने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात महादेव कोळी समाजास आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन 9 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
या आंदोलनामध्ये आदिवासी संचालक गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार सामान्य विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव, कोळी मल्हार, जमातींना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे, माननीय मुख्यमंत्री यांच्या सोबतच्या बैठकीत राज्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरी कोळी, जमातींना बोगस संबोधून सामाजिक तेढ निर्माण करणारे आयुक्त राजेंद्र भारूड यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना आयुक्त पदावरून हाटवावे, कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, या जमातीची नोंद ही कोळी हा जनरिक टर्म या संदर्भाने झाली असल्याने कोळी जनरिक टर्म सामान्य सज्ञा असल्यावर शासनाने परिपत्रक निर्मिती करावे, निजामकालीन ब्रिटिशकालीन जनगणना विभागाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार कोळी महादेव, कोळी मल्हार, जमातीच्या नोंदी कोळी झाल्या असल्याने केवळ कोळी नोंदीवरून या दोन्ही जमातीची प्रकरणे अवैध ठरवू नये, सन 1950 पूर्वीचा पुरावा व रक्त नात्यातील वैधता प्रमाणपत्र न मागता मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमातींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाडा विभागात प्राधान्याने विशेष अभियान राबवावे या व अन्य मागण्यासाठी आज बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी च्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी गणेश सूर्यवंशी, निवृत्ती रेखडगेवाड, रमेश पिटलवाड, किशोर सूर्यवंशी, श्रीकांत सोळंके, साईनाथ सोळंके, अनिता बुधवारे, यशोदा चुनवटे, पार्वती सूर्यवंशी, शोभा सोगे, कविता सोगे सह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी