रिसोड देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करा,वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तालुक्याच्या वतीने निवेदन.
रिसोड: येथील पोस्ट ऑफिस समोर सुरू होणारी देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करणे व तसेच रिसोड नगरपरिषद ने दिलेली एन. ओ. सी रद्द करा वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आला आहे, रिसोड शहरातील सिव्हिल लाईन पोस्ट ऑफिस समोर नव्यानेच देशी दारूचे दुकान सुरू होत आहे व त्यास रिसोड नगरपरिषद ने सुद्धा एन.ओ.सी दिली आहे परंतु हा अतिशय गजबजीचे ठिकाण असून त्या ठिकाणावरच पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय, बस स्टॅन्ड असल्यामुळे महिला व शाळेतील मुलींची खूप गजबज असते. देशी दारू पिणारे गलिच्छ भाषेचा उपयोग, महिलांची व मुलींची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या रिसोड नगरपालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासक नेमल्या कारणाने सर्वच अधिकार हे आपल्याच हातात आहे . एवढ्या गजबजल्या ठिकाणी देशी दारूच्या दुकानाची एन.ओ.सी कोणत्या आधारावर देण्यात आली.तरी या देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करून नगरपरिषदेने दिलेली एन.ओ.सी सात दिवसात रद्द करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तालुक्याच्या वतीने रिसोड नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा अधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन रिसोड ले देण्यात आली आहे.
न्यूज टूडे 24
प्रतिनिधि,फय्याज़ कुरेशी रिसोड