मधुकर सुरवसे यांची नाभिक एकता महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी फेरनिवड
सुरवसे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर पंढरी सुरवसे यांची नाभिक एकता महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. सुरवसे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान आण्णा बिडवे यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष विकास भाऊ काळे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर पंढरी सुरवसे यांची नाभिक एकता महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्रात नमूद केले आहे की, आपणांस सामाजिक तसेच संघटनात्मक कार्याचा अनुभव असल्याने नाभिक एकता महासंघाच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदावर आपली तिसऱ्यांदा फेरनियुक्ती पुढील दोन वर्षांकरीता करण्यात आलेली आहे.नाभिक समाजासाठी आपले योगदान आहे, समाजावरील अन्यायाविरोधात आपण सातत्याने कार्यरत असता. तसेच समाज हितासाठी आपला नेहमी पुढाकार असतो. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नाभिक समाजातील सर्व घटकांना एकत्रीत करून नाभिक एकता महासंघाचे रचनात्मक संघटन उभाराल ही अपेक्षा आहे. देश व राज्यपातळीवर नाभिक समाज संघटीत करण्याचे कार्य नाभिक एकता महासंघ करीत आहे. विविध भाषा असलेल्या अनेक प्रांतातील नाभिक बांधव आजही असंघटीत आहेत. प्रांतनिहाय समाजाचे अनेक प्रश्न आहेत. देश व राज्यातील नाभिक बांधवांची एकजुट करून बलशाली असे संघटन उभारून समाजाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक न्याय मिळविण्याकरीता कार्य करावयाचे असल्याने आपणही आपल्या कार्यक्षेत्रातील समाजाचे संघटन करावे. महासंघाच्या कार्यात आपले व आपल्या कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे योगदान अपेक्षीत आहे. निश्चितच आपण या कार्यात यशस्वी व्हाल. आपणांस पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. नाभिक एकता महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष भगवान आण्णा बिडवे आणि बीड जिल्हाध्यक्ष विकास भाऊ काळे यांचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मधुकर पंढरी सुरवसे यांनी आभार मानले आहेत. पुढील काळात न्याय मिळवून देण्यासाठी नाभिक समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनेला अधिक बळकट करणार असल्याचे सुरवसे यांनी सांगितले. तर फेरनियुक्तीबद्दल मधुकर सुरवसे यांचे ज्ञानेश्वर चातुर, विक्रम बिडवे, श्रीहरी गवळी, माणिकराव (आण्णा) हारणे, संभाजी राऊत, डॉ.केशव राऊत, ओम गवळी, श्रीकांत घोडके, विष्णू कचरे, माधव कांबळे, प्रवीण सुरवसे, विजय गवळी, दत्ता काळे, नाथराव गवळी, बालाजी वाघमारे, दिलीप सूर्यवंशी ,भागवत राऊत, गणेश शिंदे, बालाजी हरणे, अशोक वाईंगडे, सोपान सुरवसे, विठ्ठल शिंदे, अशोक शिंदे, दत्ता गोरे, संदीप कचरे, रामेश्वर सुरवसे, गोविंद सावंत, चंद्रकांत सुरवसे, ऋषिकेश मोरे, वसंत वानकर, उद्धव राऊत, रवी काळे, बालाजी कचरे, अमित चव्हाण, हनुमंत वाघमारे, सुभाष राऊत, माऊली कांबळे, दिलीप कांबळे, राजकुमार जाधव, गणेश कांबळे आदींसह इतरांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.