बांधकाम व्यवसायिकच्या रोहाउसेससाठी चालू असलेले अनधिकृत रस्त्याचे काम थांबवा -अभिजीत लोमटे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील एका नामांकित बांधकाम व्यवसायिकाचे सर्वे न 409 मधील त्यांच्या खाजगी जागेत रोहाउसेस चे काम चालू आहे मात्र यासर्वे नंबर मध्ये जाण्यासाठी कोठूनही रस्ता नव्हता.त्यामुळे सर्वे न 410,411 मधून अनधिकृत रस्ता करण्यात आला आहे.
सदरील जमीन ही जामा मस्जिदची असून या जमिनीचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहे असे असताना अनधिकृत पणे रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम थांबवावे यासाठी वफ्फ बोर्ड चे पत्रही आले असताना याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे या संबंधि डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईचे अध्यक्ष पत्रकार अभिजीत लोमटे यांनी माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली असून या रोहाउसेस मध्ये अंबाजोगाईतील मातबर नेत्याची भागीदारी असल्याची चर्चा आहे त्यामुळे राजकीय दबावाखाली अधिकारी असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.सदरील रस्त्याचे काम थांबवन्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी व रस्ता तात्काळ थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना ईमेल द्वारे केली आहे मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषनाचा इशारा ही दिला आहे.