शेवटी जिल्हा परिषद प्रशासनाने शिपायांवर आणली आमरण उपोषण करण्याची वेळ..?
20 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण व घंटानाद आंदोलन करणार – राज्यसचिव मुकुंद तुरे यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पदोन्नती प्रक्रियेतील दिरंगाई व जिल्हा परिषद बीड येथील विविध विभागांतील परिचर संवर्गाला सामान्य प्रशासन विभागांकडून मिळणारी सापत्न वागणुक यामुळे परिचर संवर्गामध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखा, बीड यांच्या वतीने दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी पासुन संघटनेचे राज्यसचिव मुकुंद तुरे (म.रा.जि.प.प.क.संघटना, सहसचिव राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई, शासन मान्यता प्राप्त) यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत कळालेली माहिती अशी की, दि.07 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाने कनिष्ठ सहाय्यक पदांचे सेवा प्रवेश नियमांची अधिसुचना निर्गमित झालेली आहे. त्यामध्ये परिचर वर्ग-4 कर्मचा-यांमधून कनिष्ठ सहाय्यक वर्ग-3 पदांवर पदोन्नतीचे प्रमाण 40 टक्के करण्यात आलेले आहे व 10 टक्के पदे हि वाहनचालकातून कनिष्ठ सहाय्यक पदांवर येऊ इच्छिणारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत, तसेच जर वाहनचालकांतून जर कनिष्ठ सहाय्यक पदांवर येण्यासाठी कोणी इच्छुक नसेल तर ती पदे देखील पदोन्नतीने भरण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश अधिसूचनेत दिलेले आहेत. त्याचबरोबर दि. 11 मार्च 2024 रोजी कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग मुंबई यांनी अधिसुचनेनूसार कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सुचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा कार्यकारीणी सोबत बैठक होवून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. असे असून देखील व शासनाची अधिसूचना व कार्यवाही करण्याचे निर्देश येऊन ही जवळपास तीन महीने उलटून गेलेले आहेत. तसेच जिल्हा परिषद अहमदनगर, परभणी, अमरावती, वाशिम, नांदेड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगांव अशा महाराष्ट्रातील विविध जिल्हा परीषदांमध्ये दि. 7 मार्च 2024 रोजीच्या अधिसुचनेनूसार पदोन्नती प्रकिया पार पडलेली आहे. संघटनेच्या जिल्हा शाखा, बीड यांच्या माध्यमातून याप्रश्नी वेळोवळी निवेदने देऊन ही बीड जिल्हा परीषदेमध्ये कनिष्ठ सहाय्यक पदांची पदोन्नती प्रक्रियेला अजुन ही सुरूवात झालेली नाही, तसेच परिचर वर्ग-4 कर्मचा-यांचे कालबध्द पदोन्नतीची प्रकरणे ही पुर्णत्वास गेलेली नाहीत किंवा तशा प्रकारचे आदेश आजपावेतो निर्गमित झालेले नाहीत, त्यामुळे बीड जिल्हा परिषदेतील परिचर वर्ग-4 कर्मचा-यांमध्ये अतिशय तीव्र निराशाजनक वातावरण आहे, तसेच जिल्हा परिषद बीड येथील विविध विभागांतील परिचर संवर्गाला सामान्य प्रशासन विभागांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना परिचर संवर्गामध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनांचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखा, बीड यांच्या वतीने दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी पासून राज्यसचिव मुकुंद तुरे (म.रा.जि.प.प.क.संघटना, सहसचिव राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई, शासन मान्यता प्राप्त) यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, तरी याप्रश्नी राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी स्वतः लक्ष घालून बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला तात्काळ सूचना कराव्यात अशी जिल्हा परिषदेच्या 11 तालुक्यातील 600 शिपायांची भावना आहे असे राज्यसचिव मुकुंद विनायकराव तुरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
आंदोलनाचे स्वरूप :
० दि. 20 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा परिषदेसमोर राज्यसचिव मुकुंद तुरे (म.रा.जि.प.प.क.संघटना, सहसचिव राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई) व सौ.ज्योत्स्ना वाघमारे (महिला उपाध्यक्ष) हे आमरण उपोषणाला बसतील.
० उपस्थित इतर परिचर कर्मचारी दिवसभर घंटानाद आंदोलन करतील.
० आंदोलन काळात प्रत्येक तालुकास्तरीय मुख्यालये व कार्यरत ठिकाणावर परिचर कर्मचारी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळी फीत लाऊन कामकाज करतील.