Close Menu
    What's Hot

    Nilesh lanke : जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम व सोनेतारण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : खा.लंके

    November 16, 2026

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत देवळाली प्रवरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी उत्साहात
    Ahmednagar

    हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत देवळाली प्रवरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी उत्साहात

    newstoday24By newstoday24August 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत देवळाली प्रवरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी उत्साहात

    हर घर तिरंगा उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि.९ ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेवून प्रभात फेरी घोषणांनी शहर दणानुन सोडले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. देशभर आनंदाचे वातावरण आहे. सन २०२२ पासून हर घर तिरंगा अभियान सुरु आहे. या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि.९ ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेवून प्रभात फेरी काढण्यात आली. देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयाच्या आवारातून काढण्यात आलेल्या या रॅलीला मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी हिरवी झेंडी दाखविला.यावेळी पालिकेचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
    प्रभात फेरी दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ लावा, वंदे मातरम, भारत माता की जय,यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणामुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते. यावेळी विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना लेखापाल कपिल भावसार यांनी सामुहिक शपथ दिली.यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे, प्राचार्य पोपट कडुस, पर्यवेक्षक राजेंद्र भालेकर,आल्हाट,मकरंद रायते, उर्दु शाळेच्या मुख्याध्यापिका नुजहत सय्यद,आसिफ शेख सर, प्रशासकीय अधिकारी नानासाहेब  टिक्कल,संभाजी वाळके,संगणक अभियंता भूषण नवाल,कनिष्ठ अभियंता दिनकर पवार,उदय इंगळे,अजय कासार, विजय साठे,गोरख भांगरे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन करनिरीक्षक तुषार सुपेकर यांनी केले.

    News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleदोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा – मागणीसाठी सभासदांचे सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण
    Next Article स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगाई शाळेत फिरत्या विज्ञान प्रदर्शनास उदंड प्रतिसाद.
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.