उंबरे येथील प्राथमिक शाळेस 225 फळझाडांची गिरी करनिका ग्लोबेल फाउंडेशनचीअनोखी सप्रेम भेट
राहुरी : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे या शाळेतील शिक्षकासह विद्यार्थी विद्यार्थिनीना गिरी करनिका ग्लोबेल फाउंडेशन अहमदनगर या संस्थेचे संस्थापक प्रदीप पवार व किशोर राठोड यांनी जांभूळ, आवळा, चिंच अशा 225 फळझाडांची लागवडीसाठी मोफत वाटप केले आहे. वृक्ष वाटप कार्यक्रमानंतर गिरी करनिका ग्लोबल फाउंडेशन चे प्रदीप पवार व किशोर राठोड यांचा सत्कार करण्यात आला सत्कार्याला उत्तर देताना ते म्हणाले की दिलेली झाडेही फळझाडे असल्याने त्याची निश्चित स्वरूपात लागवड होऊन संगोपन केले जाईल आणि त्यातूनच निसर्गाचा समतोल राखण्याचा आमचा मानस सफल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
(जालिंदर ढोकणे ,राहुरी)