क्रेडाई महाराष्ट्रची ग्रामीण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जॉबची हमी – डॉ.धर्मवीर भारती
सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व जॉब ऑफर लेटर मिळवा ; क्रेडाई महाराष्ट्र व कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाईचा कौतुकास्पद उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
क्रेडाई महाराष्ट्र व कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. त्यानुसार सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व पहिल्याच दिवशी जॉब ऑफर लेटर मिळवा हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील नवीन करिअरच्या संधी हा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपस्थित मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या २३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जॉब ऑफर लेटर देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांनी सांगितले की, क्रेडाई महाराष्ट्र व एम.बी.ई.एस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग यांच्या मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच दि.१८ जुलै २०२४ रोजी चार वर्षांचा सामंजस्य झाला. त्याच अनुषंगाने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाई येथे रविवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या व पहिल्याच दिवशी जॉब ऑफर लेटर मिळवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील नवीन करिअरच्या संधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे प्राचार्य डॉ.खडकभावी यांनी सांगितले. या कार्यक्रमात मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. तसेच कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांनी हा उपक्रम आमच्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे मत व्यक्त केले. तर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण २३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जॉब ऑफर लेटर देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव डॉ.धर्मवीर भारती, क्रेडाई अंबाजोगाई शाखेचे संस्थापक अध्यक्ष संजय सुराणा हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.बी.जी.खिचडी (बिडवे इंजिनियरिंग कॉलेज, लातूर) हे होते. स्थापत्य विभागप्रमुख डॉ.व्ही.एस.राजमान्य यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रस्ताविक करताना डॉ.राजमान्य यांनी प्रारंभी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग यांच्या सातत्यपूर्ण उंचावणाऱ्या कामगिरीची नोंद घेवून सामंजस्य करार केल्याबद्दल क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक डॉ.अजित थेटे यांचे आभार मानले. पुढे बोलताना डॉ.राजमान्य म्हणाले की, सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व जॉब ऑफर लेटर मिळवा हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. त्याचा सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा. याप्रसंगी बोलताना डॉ.धर्मवीर भारती म्हणाले की, पूर्ण जगाला स्थापत्य अभियांत्रिकीची ओळख भारतानेच करून दिली. २ हजार वर्षांपूर्वी अजिंठा वेरूळची लेणी हे एक त्याचे उत्तम उदाहरण आहे. क्रेडाई महाराष्ट्र हे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाईच्या ग्रामीण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जॉबची हमी देतो असे आश्वासन डॉ.भारती यांनी दिले. आणि सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व जॉब ऑफर लेटर मिळवा या उपक्रमाचे कौतुक केले. व हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत असे डॉ.भारती यांनी सांगितले. या प्रसंगी बोलताना संजय सुराणा म्हणाले की, आज बांधकाम क्षेत्राकडे इतर विकसित देशाप्रमाणेच चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अंबाजोगाईच्या सिव्हिल इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना फिल्ड ट्रेनिंग सोबत स्टायफंड देण्याची घोषणा श्री.सुराणा यांनी दिली. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.बि.जी.खिचडी म्हणाले की, क्रेडाई महाराष्ट्र हे तरूण उद्योजकांना रियल इस्टेट क्षेत्राच्या सर्वांगिण वाढीसाठी सहकार्य करते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर उपस्थिती व प्रात्यक्षिके (प्रॅक्टीकल) करणे जास्त गरजेचे आहे. सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व जॉब ऑफर लेटर मिळवा हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे प्रा.खिचडी यांनी सांगितले. तर कार्यवाहक प्राचार्य डॉ.एन.ए.रावबावले यांनी सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व जॉब ऑफर लेटर मिळवा या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून क्रेडाई महाराष्ट्र यांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा.एस.ए.बिराजदार, डॉ.बी.एस अलुरकर, टि.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य एल.व्ही.बगले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थापत्य विभागप्रमुख प्रा.पी.ए.वेदपाठक, एन.व्हि.मुंडे, जे.एम.चव्हाण, टी.आर.मोरे, ए.ए.गुळभिले, एन.ए.शेख, के.आर.जामकर आणि एम.टी.लाईदवार यांनी पुढाकार घेतला.
मराठवाड्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग :
बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या व पहिल्याच दिवशी जॉब ऑफर लेटर मिळवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील नवीन करिअरच्या संधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. काही विद्यार्थ्यांनी हा उपक्रम आमच्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
२३ विद्यार्थ्यांना मिळाले जॉब ऑफर लेटर :
क्रेडाई महाराष्ट्र व अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग यांच्यात नुकताच चार वर्षांचा सामंजस्य करार झाला. त्यानुसार सिव्हिल इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या व पहिल्याच दिवशी जॉब ऑफर लेटर मिळवा हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या २३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जॉब ऑफर लेटर देण्यात आले. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वागत केले.