भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत विधीमंडळात आवाज उठविणार : आ.रोहित पवार
_ मांदळी येथे भटक्या विमुक्तांची संघर्ष परिषद संपन्न ; राज्यभरातील समाज बांधवांची उपस्थिती !
कर्जत :: भटक्या विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्याकरिता सरकारकडून शिक्षणाच्या बाबत जनगणना होणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणारच असल्याने या समाजाचे मुद्दे व मूलभूत प्रश्न हे सरकार नक्कीच सोडवेल. येत्या काळात आपण भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नाला विधीमंडळात वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करू, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली.कर्जत तालुक्यातील मांदळी येथे भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने भटक्या विमुक्तांची संघर्ष परिषदेचे आज दि.१० आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रथमता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. तर समाजाच्या वतीने आ.रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे संयोजक प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव फुलमाळी, प्रदेशाध्यक्ष सुधीर अनवले सर, कर्जत तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, देवेंद्र तायडे, सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, सरचिटणीस रावसाहेब फुलमाळी, धनाजी गुरव, सिनेअभिनेते राजेश नन्नवरे, गंगाधर पालवे, धनंजय गुरव, कवी गुलाबराजा फुलमाळी, सचिन गोंडे, शिवाजी शिंदे, आनंद वंजारे, काशिनाथ चौगुले, गोपाळ सरवदे, गंगाधर गुंडाळे, मारूती गजरे, गोपाळ आव्हाड, राजूभाऊ सांगळे, धनुभाऊ कु-हाडे, युवराज माळी, बाबु काकडे, भिमा काकडे, शिवाजी पालवे, पिंटू फुलमाळी, बाजीराव फुलमाळी, नारायण गजरे, यल्लापा फुलमाळी, उत्तम फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबु गायकवाड, रामा फुलमाळी, भानुदास काकडे, साहेबराव काकडे, गंगाधर गायकवाड, अस्लम शेख तसेच उद्योजक अनिल पांडुळे, जयसिंग थेटे, तानाजी पिसे, संदीप गांगर्डे, सुधीर बचाटे, बाशाभाई हावलदार आदींसह या संघर्ष परिषदेसाठी राज्यभरातील नंदिवाले, तिरमली, भराडी, वैदू, वडार, कैकाडी, गोपाळ, गोसावी, लोहार, गोंधळी, जोशी, राजभोई, रामोशी, बंजारा, घिसाडी व इतर भटक्या विमुक्त समाजाचे राज्यभरातील पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
प्रतिनिधी महंमद पठाण सह नयुम पठाण कर्जत