कुलाबा मतदारसंघात सुविधांच्या अभावी नागरिक त्रस्त, ५० कोटीचा निधी गेला कुठे ?- खासदार प्रा. वर्षा गायकवाड
राहुल नार्वेकरांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात पाणी माफियांचे राज्य
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात ‘पाणी’ माफियांचे जाळे पसरले असून लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी पुरवठा महानगर पालिकेची जबाबदारी असताना या पाणी माफियांना आमदार राहुल नार्वेकरांचे संरक्षण आहे का असा सवाल खासदार प्रा वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.
मुंबईत आज मुंबै काँग्रेसने मुंबई जोडो न्याय यात्रा कुलाबा ते आझाद मैदान यादरम्यान काढला होती.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदासंघातील कूपरेज ते कुलाबा या दरम्यान पदयात्रेत स्थानिक लोकांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न समोर येत होते. आ.राहुल नार्वेकर यांना एका दिवसात ५० कोटी रुपयांचा विकासनिधी मुंबई पालिकेने मंजूर केला. मात्र येथील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे आणि सर्व नागरी सुविधांची प्रचंड अभाव मतदार संघात दिसून येत आहे. त्यामुळे या ५० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज केली आहे.
कुलाबा विधानसभा क्षेत्रात खुलेआम सुरु असलेले पाणी माफियांचे जाळे उध्वस्त झाले पाहिजे, कुलाबा येथील रहिवाशांना स्वतंत्रपणे पाण्याचे कनेक्शन दिले पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.
मुंबई काँग्रेस, राजीव गांधी भवन येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेसाठी खासदार प्रा. वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, माजी आमदार अशोक जाधव, संदिप शुक्ला, भरत सोनी, शकील चौधरी, इत्यादी उपस्थित होते.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई.