खुनाच्या गुन्हयातील दोन आरोपी 24 तासात अटक..
पो.स्टे. एमआयडीसी, लातुर येथे खुनाचा गुन्हा दाखल.
रात्री 10:00 वा. च्या सुमारास लातुर जिल्हयातील पो.स्टे. एमआयडीसी, लातुर मौजे चिंचोलीराव शिवारात चिंचोलीराय ते गंगापुर जाणारे रोडच्या बाजुच्या खडयात एक अनोळखी इसम मृत अवस्थेत मिळून आला. एमआयडीसी पोलिसांनी मयत इसमाची ओळख पटवली असता सदरचा इसम हा अलमला तांडा ता. औसा जिल्हा लातूर वय 25 वर्षे असल्याचे समजले. यावरुन मयताच्या आईच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुधात पो.स्टे. एमआयडीसी, लातुर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी लातुर शहर श्री. भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. एमआयडीसी, लातूर पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वात तपास पथके तयार करुन त्यांना अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सखोल मार्गदर्शन करुन सुचना देण्यात आल्या होत्या.
सदर गुन्हयाचे तपासात मयताच्या पत्नीचा लग्नापुर्वीचा रा. चिंचोलीराय तांडा व त्याच्या साथीदार सुशिल संतोष पवार रा. चिंचोलीराव ता.जि. लातुर याच्या मदतीने दोरीने मयताचा गळा आवळून त्यास ठार केल्याचे कबुल केल्याने दोन्हीही आरोपींन अटक करुन आज रोजी मा. न्यायालयात हाजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. खुनाच्या कारणाची अधिक माहिती करून घेण्याचा प्रयत्न सुरू असून पुढील तपास सुरू आहे.