केज येथील योगिता रुग्णालयात ११ दिवसाच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)– विकासापासून शेकडो कोस दुर असलेल्या केज येथील योगिता नर्सिंग होम व बोल रुग्णालयात १२ दिवसांच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करून बाळाला जीवनदान देण्यात डॉ. दिनकर राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे. केज सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात आव्हान असणारी ही अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉ. दिनकर राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील युसुफवडाव या गावातील एका महिलेची नॉर्मल प्रसुती अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व स्त्रीरोग निदान विभाग झाली होती. प्रसुती नंतर बाळ व बाळांतीन सुखरुप असल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र बाळाच्या जन्मानंतर पाच-सहा दिवसांनी त्याला अपचन व लुटीचा त्रास सुरु झाला. हा त्रास सुरु झाल्यानंतर बाळाच्या पालकांनी कळंब येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केले, मात्र बाळाचा आजार वाढतच गेला. यानंतर म्हणजे बाळ १० दिवसाचे असतांना सदरील बाळाला उपचारासाठी केज येथील योगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. दिनकर राऊत यांनी बाळाचा आजार त्यांचे आई कडून व्यवस्थित समजावून घेतली. आजारांचे गांभिर्य व विविध शक्यतांचे निरसन करण्यासाठी डॉ. दिनकर राऊत यांनी बाळाच्या विविध तपासण्या केल्या असता त्यांना बाळाच्या पचनसंस्थेत मोठा बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यांनी पचनसंस्थेचा महत्वाचा भाग असलेल्या आतड्यांची सोनोग्राफी करण्यास सांगितले. सदरील सोनोग्राफी अंबाजोगाई येथील डॉ. नितीन पोतदार यांचे कडे करण्यास सांगून डॉ . पोतदारा यांना बाळाच्या आजाराची लक्षणे व सांभाव्य शक्यता सांगितल्या. डॉ. पोतदार यांनी सोनोग्राफी करताना सुक्ष्म अभ्यास करून आतड्याच्या गुंतागुंतीचे योग्य निरीक्षण केले व याबाबतचा अहवाल डॉ. दिनकर राऊत यांचे कडे पाठवला. ११ दिवसांच्या बाळाच्या आतड्यातील संशयास्पद गुंतागुंतीची खात्री झाल्यावर ही अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची कल्पना डॉ. राऊत यांनी बाळाच्या आई-वडिलांना दिली. त्यांनी ही शस्त्रक्रिया याच रुग्णालयात करण्याचा आग्रह डॉ. राऊत यांच्या कडे धरला. डॉ. दिनकर राऊत यांनी ही अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केज सारख्या अविकसित भागातील रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या सोनोग्राफी चे रिपोर्ट संभाजी नगर येथील प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक डॉ. रामदास यांचे कडे पाठवला व त्यांचे मार्गदर्शन घेतले. बाळाला वाचवण्यासाठी सदरील ११ दिवसांच्या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा तातडीने निर्णय घेतला. सदरील शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. दिनकर राऊत, डॉ. रामदास व लातुर येथील बालरोग तज्ञ डॉ. सागर, एनआयसीयू चार सर्व स्टाफ, सहकारी परिचारीका मंगल, जाधव, एनआयसीयू चा बॅक बोन बाळू व इतर स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभले. ११ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांच्या आहाराचे व औषधांचे योग्य नियोजन लावून बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बाळाला रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला. सध्या बाळाची प्रकृती उत्तम आहे.
▪️ डॉ. दिनकर राऊत एक उत्तम
बालरोग तज्ञ!
केज येथील योगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालय चे प्रमुख डॉ. दिनकर राऊत हे महाराष्ट्रातील एक निश्नांत बालरोग तज्ञ आहेत. यापुर्वीच ही त्या लहान मुलांवर अनेक अवघड शस्त्रक्रिया केज सारख्या मागास विभागात असलेल्या आपल्या खाजगी रुग्णालयात केल्या आहेत. बालरोगावरील विविध राज्य व देशपातळीवर परीक्षांमध्ये त्यांनी आपले प्रबंध सादर केले आहेत. या विभागातील बालकांचा जीवनातला म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.