ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी ; संघटनेत अनेकांचा प्रवेश
अंबाजोगाई – ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी तसेच जाहीर प्रवेश करणाऱ्या अनेकांचे स्वागत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीतून करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड आणि मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी सांगितले की, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशावरून मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे, जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मौलिक मार्गदर्शन केले. या बैठकीत बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी नितीन गोदाम, केज तालुकाध्यक्षपदी समाधान बचूटे, बीड जिल्हा आयटी सेल अध्यक्षपदी प्रतिक वाघमारे, केज तालुका युवक अध्यक्षपदी राजकुमार धिवार, अंबाजोगाई तालुका युवक अध्यक्षपदी शैलेंद्र बनसोडे, बीड जिल्हा युवक उपाध्यक्षपदी विश्वास भालेराव, परळी तालुका उपाध्यक्षपदी कमलाकर घाडगे, अंबाजोगाई युवक तालुका उपाध्यक्षपदी अक्षयभैय्या कसबे, अंबाजोगाई तालुका युवा उपाध्यक्षपदी गफार खुरेशी, सुरज नाईकवाडे, अंबाजोगाई तालुका संघटक, अंबाजोगाई तालुका युवक उपाध्यक्षपदी शुभम मस्के, ॲटो युनियन शहराध्यक्षपदी सुनिल खैरमोडे यांच्या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी ऑल इंडिया पँथर सेनेत अनेकांनी प्रवेश केला. अल्पसंख्यांक समाजातील महिला आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या बैठकीस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनाताई लोंढे, बीड जिल्हा सरचिटणीस विजयबाबा कांबळे, जिल्हा सचिव वसीमभाई शेख, जिल्हा संघटक सुशिल गायकवाड हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष बादल तरकसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष जीवन सोनकांबळे यांनी मानले.
ऑल इंडिया पँथर सेनेला संघटनात्मकदृष्ट्या बळकट करणार :
मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रियपणे काम करीत असताना समाजसेवेला अधिक महत्त्व दिले आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर आमचा कायम विश्वास आहे. आगामी काळात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली चळवळीत काम करणाऱ्या युवक, महिला यांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल. संघटना वाढविण्यासाठी, संघटनेची उद्दिष्टे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. यावेळी अनेकांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. म्हणून पुढील काळात ऑल इंडिया पँथर सेनेला संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट करणार आहोत.
– अक्षय भुंबे
(मराठवाडा युवक अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना)