राहुरीत वन कर्मचाऱ्याकडून मेंढपाळ महिलेची छेडछाड गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यामध्ये दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी चार च्या दरम्यान एका तीस वर्षीय मेंढपाळ महिलेची छेडछाड करण्याचा प्रकार घटल्याने संबंधित वन कर्मचाऱ्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर वाघचौरे असे या आरोपीचे नाव असून हा आरोपी 11 ऑगस्ट रोजी दुपारी चार च्या दरम्यान मेंढपाळाचे पाल जिथे आहे तेथे गेला व तुम्ही अजून इथून गेला नाहीत का असे म्हणत त्या पालामध्ये शिरून तुम्ही फार छान दिसता असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिच्याशी झटपट केली तुमच्यावरती आत्ता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो असे म्हणत तिथून निघून गेला झालेला प्रकार या महिलेने आपल्या कुटुंबीयांना सांगितले सदर महिला व कुटुंबीय राहुरी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केल्याने सागर वाकचौरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून राहुरीचे पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करीत आहे
(जालिंदर ढोकणे राहुरी)