मुंबई पालिका विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे अनोख्य आंदोलन.
आज मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने दक्षिण मुंबईतील मुंबई महानगर पालिका बी वॉर्ड कार्यालयाबाहेर लाडला खड्डा योजनेंतर्गत टाळेबंदी मोर्चा काढण्यात आला, यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, राज्यातील शिंदे फडणवीस पवार या भ्रष्ट सरकारने मुंबईला खड्डेमय केले आहे, काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीकडून 30% जादा कमिशन देऊन केलेल्या भ्रष्ट कामांना युवक काँग्रेस विरोध करत आहे . शिंदे फडणवीस पवार या काळ्या यादीतील कंपनीची सरकार दलाली करत आहे.
या मोर्चात जिल्हाध्यक्ष अदनान पारीक, मुंबई उपाध्यक्ष हिना कनोजिया, हरगुन सिंग, सरचिटणीस फरहान खान, आतिफ अन्सारी, अमीन पारीख, अतीक साहिबोले, विजय कनोजिया, अमन अन्सारी, माझ खान, दानीस सय्यद, कैफ गिरनारी यांच्यासह अनेकानी मित्रांनी सहभाग घेतला. पोलिसांनी अटक केली होती.