राहुरीच्या मुळा धरणातूनआज 2000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग
राहुरी – अहमदनगर जिल्ह्याला जलसंजीवनी म्हणून ओळख असणाऱ्या मुळा धरणातून आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी नदीपात्रात सर्व 11 दरवाजातून 2000 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धरणाचे साठे 90% च्या पुढे गेल्याने बहुतांश धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे यंदा 15 ऑगस्ट पूर्वी धरण साठा परीचलन सूची प्रमाणे अगोदरच पूर्ण झाल्याने आज जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या हस्ते कळदाबून दुपारी तीन च्या सुमारास पाणी सोडण्यात आले मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने तसेच पाण्याच्या आवक मध्ये वाढ झाल्यास अधिक क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो त्यामुळे मुळा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
( जालिंदर ढोकणे राहुरी)