ढवळागीर फासेपारधी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे.
परभणी: ढवळागीर फासेपारधी सार्वजनिक सामाजिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रात फासेपारधी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी काम करत असते त्यांच्या माध्यमातूनच फासेपारधी या समाज घटकाच्या मूलभूत प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन उपोषण केले जात असते
12 ऑगस्ट पासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात फाशी पारधी समाजाला गायरान जमीन मिळावी यासाठी आणि इतर प्रमुख मागण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील आराध्य दैवत खंडोबा यांच्या नावे असलेली देवस्थानची जागा तात्काळ जगन सूर्यभान चव्हाण यांच्या संस्थेच्या नावाने करण्यात यावी, वन ,जमीन, गावपेरा सरकारी जमीन इत्यादी फाशी पारधी समाजाचे नावे करण्यात यावे, महाराष्ट्रातील एसटी प्रवर्गातील शिकलेल्या सर्वच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावे व जेणेकरून हे तरुण गुन्हेगारी कडे वळणार नाहीत नाही , महाराष्ट्रातील कुठल्याही समाजाला आता एसटी या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हे उपोषण चालू राहणार असे उपोषणकर्ते जगन सुर्यभान चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी