अंबाजोगाईचा युवा उद्योजक धनराज काळे याना “महाश्रेष्ठ उद्योजक-२०२४” पुरस्कार जाहीर
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून आपले नाव अवघ्या मराठवाड्यासह महाराष्ट्रभर करणारे युवा उद्योजक धनराज रामकृष्ण काळे यांना टायकूनस ऑफ एशिया या संस्थेच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा असा “महाश्रेष्ठ उद्योजक-२०२४” हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथे १८ ऑगस्ट रविवार रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये केले जाणार आहे.
मागील पंधरा वर्षांपासून अंबाजोगाई शहरात अरुण मेडिकोजच्या माध्यमातून औषध व्यवसायात धनराज काळे यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. अतिशय अल्पावधीतच धनराज यांनी आपला व्यवसाय केवळ अंबाजोगाई शहरपूरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरविला. त्यानंतर लातूर, धाराशिव व परभणी जिल्ह्यात देखील आपला औषधी व्यवसाय पसरविला.आज या व्यवसायाच्या माध्यमातून वीस ते पंचवीस तरुण बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होऊन धनराज काळे यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे.