वयोवृद्ध रुग्णांच्या सेवेसाठी तळागळा पर्यंत जाऊन काम करणे काळाची गरज – अविनाश उगले
पाटोदा ममदापूर येथे आरोग्य शिबिर संपन्न
अंबाजोगाई – वयोवृद्ध नागरिका मध्ये दमा या आजारासह गुडघेदुखी कंबरदुखी मनक्याचा त्रास ,कमी दिसणे ऐकू न येणे असे अनेक आजार वयोवृद्ध अवस्थेत उद्भवतात अशा वयोवृद्ध रुग्णांना तळागळा पर्यंत जाऊन सेवा देण्याचे काम करणे काळाची गरज आहे अनेक आजार असलेले रुग्ण हे पन्नास वर्षाच्या पुढील असतात अशा रुग्णांची सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन करावी मंदा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अविनाश उगले यांनी केले ते अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे ता. 12 सोमवार रोजी मंदा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आपेगाव यांच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी बोलत होते . या आरोग्य शिबिरात पंचक्रोशीतील नागरिकांनी सेवेचा लाभ घेतला . पाटोदा ग्रामपंचायत कार्यालय येथे दमा या आजारासह अन्य आजार रोग निदान शिबिर मंदार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने घेण्यात आले .या शिबिरासाठी डॉ. आकाश वीर, सचिन गायकवाड ,महेश पाटील ,अमर वाघमारे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली .रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. दम असणाऱ्या रुग्णांना पंपाचे वाटप करण्यात आले .
यावेळीबाजार समितीचे संचालक बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव अविनाश उगले ,उपसरपंच समीर पठाण ,मनसेचे श्रीराम सावंत, मारुती सरवदे, आपेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे हरिभाऊ पवार ,आरोग्य सेवक नितीन पुंगळे ,आशा वर्कर श्रीमती सरवदे , शेख ,उगले ,पवार आदींची उपस्थिती होती .या आरोग्य शिबिराचा लाभ सोमनाथ बोरगाव ममदापूर पाटोदा नांदडी या गावातील नागरिकांनी घेतला .