हिंगणघाट डी बी पथकाची कारवाई.
हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात छोटी वणी य़ेथील कंपन्यामधून चोरीस गेलेल्या तांबे चोरीबाबत अज्ञात आरोपातांचा पो.स्टे परिसरात व आजुबाजूचे हद्दीत शोध घेत असतांना गुप्त माहीती वरून संत गोमाजी वार्ड हिंगणघाट येथील काही मुलांनी छोटी वणी येथील कंपनीमध्ये चो-या केल्या आहे अश्या माहीतीवरून संशयित मुलांचा शोध घेतला असता सदर मुलेही अठरा वर्षापेक्षा खालील वयाची मिळून आले. सदर विधीसंघर्षित बालकांना छोटी वणी येथील कंपनीमध्ये झालेल्या चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी गोमाजी वार्ड हिंगणघाट येथे राहणारा सिध्दांत मोहुरले याचे सांगितल्यावरून विधीसंघर्षित बालक यांचे स्प्लेन्डर गाडीने सिध्दांत मोहुरले यांचे सोबत जावून छोटी वणी येथील जिमा टेस्ट व दुसऱ्या कंपनीत जावून तेथील असलेल्या शेटर रूममधून मशीनला लागून असलेल्या तांब्याच्या पट्या कटरने कापून तांब्याच्या पट्या चोरी करून सिध्दांत मोहरूले यांने त्याचे घरी ठेवले आहे. अश्या माहीतीवरून सिध्दांत मोहुरले रा. गोमाजी वार्ड हिंगणघाट यांचे घरांचे घरझडती मध्ये अप क्र. 924/2024 व अप क्र. 1037/2024 चोरीस केलेल्या तांब्याच्या पट्यापैकी लहान-मोठया तुकडे केलेल्या एकूण 30 तांब्याच्या 5 किलो 100 ग्रँम किं. 6,120 रू,नगदी 2200 गुन्हयात वापरलेली हिरो होन्डा स्पेल्नडर प्लस मोटार सायकल क्र.एमएच 32 टी 4850 किं. 25,000 रू व गुन्हयात वापरलेले लोखंडी कटर किं. 500 रू असा जू.कि.33,820 रू चा माल मिळून आल्याने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. व मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि भारत वर्मा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पोशी अमोल तिजारे, यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहवा सुमेध आगलावे पो. स्टे हिंगणघाट पोलीस करत आहे.
मोहसिन खान