राष्ट्रीय सेवा योजना पथकांकडून हर.घर तिरंगा रॅली उत्साहात साजरी
श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय यांचा पुढाकार”
वाशिम प्रतिनिधी ; प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत वाशिमच्या श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये हर घर तिरंगा जनजागृती रॅली ही स्थानिक वाशिम शहरातील अलाटा प्लॉट परिसरात काढण्यात आली होती. यामध्ये बी.एस.डब्ल्यू भाग एक व भाग दोन चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, महाविद्यालय सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था ,मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करतात.तर केंद्र शासनाने २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) (Har Ghar Tiranga 2024) अभियान सुरू केले आहे. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे, तर भारतीय जनता पक्षाने ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा २०२४’ (Har Ghar Tiranga 2024) अभियानाची तिसरी आवृत्ती सुरू केली आहे. ’हर घर तिरंगा’ अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा आव्हान केले जात आहे. यावेळी श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील वाशिम शहरातील ओलाटा प्लॉट भागात प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा देऊन नागरिकांना पथनाट्याच्या माध्यमातून हर घर तिरंगा हे अभियान उत्साहात साजरे करावे असे आव्हान केले आहे.
या रॅली करिता विशेष उपस्थित असलेले मा.राष्ट्रिय युवा कोर – अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे, मा.राष्ट्रीय युवा कोर भारत सरकार (ने.यु.के) नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा अध्यक्ष जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन प्रदिप पट्टेबहादुर यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.मनीषा कीर्तने,प्रा. डॉ. भारती देशमुख,प्रा.डॉ.वसंत राठोड, प्रा.डॉ.रवींद्र पवार, प्रा. पंढरी गोरे, प्रा.डॉ.प्रसेनजीत चिखलीकर,प्रा.गजानन हिवसे, ग्रंथपाल विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय साळवे व महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.