“तरुणांनो मानसिक ताण तणावारा दूर सारून नेतृत्व गुण विकसित करा – आशिष धोंगडे”
श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे स्टुडन्ट इंडोशनल प्रोग्राम
वाशिम ; दि.13 ऑगस्ट 2024 रोजी,श्री रामराव सामाजिक समाजकार्य महाविद्यालय येथील सन – 2024-25 या वार्षिक वर्षाच्या बी.एस.डब्ल्यू परांगात भाग एक-च्या विद्यार्थ्यांना करिता स्टुडन्ट इंडस्ट्रियल प्रोग्राम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे यांनी मानसिक ताण तणाव व लीडरशिप या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले.
तर आजचा तरूण व सामजिक भूमिका या विषयावर युवा सामजिक कार्यकर्ते तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त (महाराष्ट्र शासन) मा.राष्ट्रिय युवा कोर भारत सरकार (ने.यु.कें.स) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रा.डॉ.गजानन हिमसे, प्रा.डॉ.रवींद्र पवार, प्रा.मनीषा कीर्तने, प्रा.डॉ.भारती देशमुख यांची उपस्थिती असून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.संजय साळवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आशिष धोंगडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की मानसिक ताण तणाव दुरु सारून आजच्या तरुणांनी देशाचे भवितव्य अभ्यासून नेतृत्व क्षमता विकसित करण्याकरिता समोर आले पाहिजे. नकारात्मक बाबी दूर सारून सकारात्मक दूरदृष्टीकोन अंगी करावा आपल्या बुद्धी मतेला चालना मिळावी याकरिता निरोगी आरोग्य कसे जगता येईल आणि विचार श्रेणी बळकट करणे गरजेचे आहे.
प्रदिप पट्टेबहादुर – यांनी सांगितले की आजचा तरुणांकडे सामाजिक जबाबदारी आणि भूमिका हे महत्त्वाचे आहे हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो 35.6 कोटी तरुणांची संख्या आहे. यामधील लाखो तरुण हे बेरोजगार अशिक्षित असून आहे. त्यामुळे सामाजिक ताप लक्षात घेता योग्य ती भूमिका कशी बजवावी सामाजिक आर्थिक शिक्षण व संविधानिक अधिकार व कार्याची सुरुवात जाणीव असणे गरजेचे आहे. ही बाब नव तरुणांनी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल युगात समजून घेणे गरजेचे होय.
असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम गोटे नी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा किर्तने मॅडम यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार यावेळी प्रा. गजानन हिवसे यांनी मानले.
बी.एस.डब्ल्यू (BSW)भाग एक चे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.