लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित स्मृती सदभावना समारोहात शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न
दिव्यांग सेवेपेक्षा कुठलीच सेवा श्रेष्ठ नाही -ऍड दयानंद लोंढाळ
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- जे का रंजले गांजले , तो सी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा! या तुकाराम महाराजांच्या अभंगवाणी प्रमाणे दिव्यांग, अपंगाची सेवा यासारखी कोणतीही सेवा श्रेष्ठ नाही असे स्पष्ट मत श्री योगेश्वरी पतसंस्थेचे संचालक ऍड दयानंद लोंढाळ यांनी व्यक्त केले. ते लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख तसेच लोकनेते माजी आमदार स्व. बाबूरावजी आडसकर यांच्या पुण्यस्मरण निमित आयोजित स्मृती सदभावना समारोहात प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ तसेच श्री योगेश्वरी पतसंस्थेच्या वतीने शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात श्री योगेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवनकर, जेष्ठ संचालक ब्रम्हचारी इंगळे, संचालक रुपेश चव्हाण, जावेद गवळी , ऍड दयानंद लोंढाळ, सय्यद अमजद यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सचिव गजानन कुलकर्णी हे उपस्थित होते.
या स्मृती सद्भावना समारोहाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्व. विलासराव देशमुख तसेच स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मानव विकास मतिमंद व अपंग विद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी केले.श्री योगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३५ वर्षे पतसंस्था कार्य करत आहे. जनसामान्यांचा तसेच ठेवीदारांचा विश्वास संपादन करत राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून श्री योगेश्वरी पतसंस्था आपली वाटचाल करत आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर काम करणारी माणस जोडण्याचे काम केले गेल्याचे टाकळकर यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष माणिक वडवनकर हे देखील राजकिशोर मोदींच्या विश्वासास खरे उतरून अनेक सामान्य माणसे जोडण्याचे काम करताना दिसत असल्याचे टाकळकर यांनी याप्रसंगी नमूद केले.
या कार्यक्रमात मानव विकास अपंग, मतिमंद निवासी विद्यालय तसेच मातोश्री वसतिगृह येथील १६०च्या वर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पतसंस्थेचे तज्ञ संचालक ऍड दयानंद लोंढाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री योगेश्वरी पतसंस्थेच्या वतीने गरीब होतकरू तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश तसेच शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. योगेश्वरी पतसंस्था ही केवळ अर्थकारण न करता समाजसेवेसाठी देखील सदैव अग्रेसर असल्याचे ऍड लोंढाळ यांनी नमूद केले. आज योगेश्वरी पतसंस्था ही अंबाजोगाई शहरातील एक मिनी बँक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. आज ५०कोटीच्या वर पतसंस्थेचा आर्थिक व्यवहार असून जवळपास ४५ कोटीचे कर्ज वाटप करण्यात येवून त्याद्वारे अनेक लहान मोठे व्यावसायिक उभे केले असल्याचे देखील ऍड लोंढाळ यांनी स्पष्ट केले. समाजसेवेचा वसा घेऊन पतसंस्था ही वेळोवेळी समाजातील उपेक्षित वर्गाच्या मदतीला धावून गेली असल्याने श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही अतिशय अल्पावधीतच जनमानसाच्या मनात घर केल्याचे अभिमानाने सांगितले. याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पतसंस्थेच्या वतीने गरजू , होतकरू व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मानव विकास विद्यालयातील सर्व शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.