राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत बंद घर फोडले : चोरटे सीसीटीव्हीत कैद
राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथे १४ ऑगस्टच्या पहाटे दोन ठिकाणी बंद घरे फोडल्याची घटना घडली आहे. दरम्यान पाच अज्ञात चोरटे राजेंद्र सोनटक्के व प्रसाद काळाने यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
पहाटच्या दरम्यान चोरट्यांनी गुरुकुल वसाहतीत प्रवेश करत दोन बंद घरांचे फोडले. चोरट्यांनी सुनील वेल्हाळ यांच्या बंद बंगल्याचे कुलुप तोडून आत मध्ये प्रवेश करत उचकापाचक केली. तदनंतर येथील मनीषा नवगिरे यांचे घर चोरट्यांनी टामीच्या साहय्याने तोडून आत देखील उचकापाचक केली.चोरटे आल्याचे समजताच वसाहतीतील नागरिक घराबाहेर येताच चोरट्यांनी धूम ठोकली.
यावेळी गोपाल शिंदे,बाळासाहेब भालेराव,मनोहर निघुते, पंकज ढुमने,सचिन जगताप, सागर भालेराव,अक्षय आल्हाडे,निलेश गायकवाड,किशोर भालेराव,तुषार राऊत, संतोष नहार,महेंद्र भलके आदींनी गस्त देऊन रात्र जागून जागून काढली.
अहो पोलीस राऊंडची गाडी इकडेही फिरवा
दरम्यान या भागात काही वर्षांपूर्वी दररोज पोलीस पेट्रोलिंग वाहन गस्त घालत असत परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलिंग वाहन याभागात येत नसून पोलीस प्रशासनाने या भागात पेट्रोलिंग करणारे वाहन फिरवावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे.
News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी