Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Blog»
    Blog

    newstoday24By newstoday24August 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.केशव राऊत यांची नियुक्ती…

    अंबाजोगाई (प्रतिनिधी) नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.केशव पांडुरंगराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांच्या निवडीचे समाजाच्या वतीने स्वागत होत आहे.

    नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान आण्णा बिडवे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष विकास भाऊ काळे व अंबाजोगाई तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे यांनी येथील डॉ.केशव पांडुरंगराव राऊत यांची नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्रात नमूद केले आहे की, आपण अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय आहात. आपणांस सामाजिक कार्याचा अनुभव असल्यानेच आपण नाभिक समाजाचे सरकारी, निमसरकारी, शैक्षणिक तसेच इतर सर्व क्षेत्रातील कर्मचारी, कामगार व शिक्षक यांना एकत्रित करून नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे रचनात्मक संघटन उभाराल ही अपेक्षा आहे. राज्य व देश पातळीवर नाभिक समाज संघटीत करण्याचे कार्य नाभिक एकता महासंघ करीत आहे. विविध भाषा असलेल्या अनेक प्रांतातील नाभिक बांधव आजही असंघटीत आहेत. प्रांतनिहाय समाजाचे अनेक प्रश्न आहेत. संपूर्ण देशातील नाभिक बांधवांची एकजुट करून बलशाली असे संघटन उभारून समाजास सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक न्याय मिळविण्याकरीता कार्य करावयाचे असल्याने अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे संघटन करून महासंघाच्या कार्यात आपले व आपल्या पदाधिकाऱ्यांचे योगदान अपेक्षीत आहे. आपणांस संघटनात्मक कार्याचा अनुभव असल्याने निश्चितच आपण या कार्यात यशस्वीपणे वाटचाल कराल ह्या आपणांस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. नाभिक एकता कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष भगवान आण्णा बिडवे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर, बीड जिल्हाध्यक्ष विकास भाऊ काळे, तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे यांचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष डॉ.केशव राऊत यांनी आभार मानले आहेत. पुढील काळात न्याय मिळवून देण्यासाठी नाभिक समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनेला अधिक बळकट करणार असल्याचे डॉ.केशव राऊत यांनी सांगितले. तर नियुक्तीबद्दल डॉ.केशव राऊत यांचे विक्रम बिडवे, श्रीहरी गवळी, माणिकराव (आण्णा) हारणे, संभाजी राऊत, ओम गवळी, श्रीकांत घोडके, विष्णू कचरे, माधव कांबळे, प्रवीण सुरवसे, विजय गवळी, दत्ता काळे, नाथराव गवळी, बालाजी वाघमारे, दिलीप सूर्यवंशी, भागवत राऊत, गणेश शिंदे, बालाजी हरणे, अशोक वाईंगडे, सोपान सुरवसे, विठ्ठल शिंदे, अशोक शिंदे, दत्ता गोरे, संदीप कचरे, रामेश्वर सुरवसे, गोविंद सावंत, चंद्रकांत सुरवसे, ऋषिकेश मोरे, वसंत वानकर, उद्धव राऊत, रवी काळे, बालाजी कचरे, अमित चव्हाण, हनुमंत वाघमारे, सुभाष राऊत, माऊली कांबळे, दिलीप कांबळे, राजकुमार जाधव, गणेश कांबळे, अभिषेक सुरवसे, अजिंक्य राऊत, संतोष गवळी, परमेश्वर गवळी, नवनाथ राऊत सर, राजेभाऊ जाधव, पांडुरंग कचरे, जगन्नाथ बिडवे, दत्ता काळे आदींसह इतरांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसंभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे ; उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना यांना निवेदन
    Next Article जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोदावरी बाई कुंकू लोळ योगेश्वरी कन्या शाळेचे घवघवीत यश.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.