जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोदावरी बाई कुंकू लोळ योगेश्वरी कन्या शाळेचे घवघवीत यश.
दिल्ली पब्लिक स्कूल, परळी येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत गोदावरी बाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या तीन विद्यार्थिनी विजयी झाल्या .
१) भक्ती देशमुख
२) दर्शना मंत्री
३) राजनंदिनी धायगुडे
या तीनही विद्यार्थिनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार .
सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख सौ.अंजली रेवडकर यांनी मार्गदर्शन केले .
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक व पदाधिकारी आदरणीय डॉ. सुरेश खुरसाळे , चंद्रशेखर बर्दापूरकर , गणपत व्यास , कमलाकर राव चौसाळकर , ॲड. जगदीश चौसाळकर , डॉ. शैलेश वैद्य प्रा. माणिकराव लोमटे , प्रा. भीमाशंकर शेटे ,श्री पाशु सय्यद ,श्री रमण सोनवळकर ॲड. कल्याणी विर्धे , प्राध्यापिका मोटेगावकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीना कुलकर्णी पर्यवेक्षिका सौ. स्मिता धावडकर व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .