Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»निर्भय मार्निंग वॉक करून अंबाजोगाईत डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या कार्याला अभिवादन
    Maharashtra

    निर्भय मार्निंग वॉक करून अंबाजोगाईत डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या कार्याला अभिवादन

    newstoday24By newstoday24August 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निर्भय मार्निंग वॉक करून अंबाजोगाईत डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या कार्याला अभिवादन.

    अंबाजोगाई प्रतिनिधी :- दृष्टीकोन दिनाच्या उपक्रमात अनेक नागरिकांचा सहभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक पद्मश्री डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी 11 वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणात प्रत्यक्ष गोळी चालवणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली. परंतु खूनाचे षडयंत्र रचणाऱ्या, मदत करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. तसेच पडद्यामागील मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करण्यात यंत्रणेने टाळाटाळ केली आहे असा अभिप्राय मा. न्यायालयाने दिलेल्या निकालात नोंदवला आहे. याबाबत अंबाजोगाई शहरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या कार्यकर्त्यांकडून लोकशाही मार्गाने निर्भय मॉर्निंग वॉक फेरीच्या माध्यमातून विवेकीपणाने व संवैधानिक मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करण्यात आला. निर्भय मॉर्निंग वॉक च्या माध्यमातून खूनाच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्याचे प्रशासनाला आवाहन करण्यात आले.
    अंबाजोगाई व परिसरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व चळवळीचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला, सर्वांनी शांततापूर्ण पद्धतीने यात सहभाग नोंदवला. SRT महाविदयालय अंबाजोगाई येथील संविधान कट्टा येथून 6.15 वाजता या मॉर्निंग वॉकची सुरुवात झाली. पुढे अण्णाभाऊ साठे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टँड या मार्गाने येत छ. शिवाजी महाराज चौक येथे या फेरीचा सकाळी 7 वाजता समारोप करण्यात आला. समारोपावेळी उपस्थित सर्वांसमोर प्रशासनास देण्यात येणाऱ्या विविध निवेदनांची माहिती सांगण्यात आली. सामूहिकपणे हम होंगे कामयाब हे गीत गाऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. तसेच डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर केलेल्या विज्ञानप्रसाराच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी 20 ऑगस्ट हा दिवस देशभर वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून आयोजित केला जातो. या दिवशी अंबाजोगाई शहरातील विविध शाळा-कॉलेजमधून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleजिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोदावरी बाई कुंकू लोळ योगेश्वरी कन्या शाळेचे घवघवीत यश.
    Next Article स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.