स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही
स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा नंदोरी येथे आरोपी चंद्रकांत कळस्कर याचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, आरोपीकडे अवैध दारूविक्रीचे काम करणारा त्याचा साथीदार हा मोक्कावर रंगेहाथ दारूची विक्री करतांना मिळुन आला असुन, मोक्कावर असलेल्या एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा मुद्देमाल मिळुन आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून उपस्थित असलेल्या आरोपीचे ताब्यातुन 1) एक पाढ-या रंगाची रेनॉल्ड डस्टर कार क्र. MH-20/DJ-3585 किं. 10,00,000 रू. 2) 05 खरर्ड्याचे खोक्यात व चुंगडीत विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग, रॉयल ग्रीन व ओ.सी. ब्लू. कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 240 सिलबंद शिशा कि 84,000 रू 3) 08 खरर्ड्याचे खोक्यात, प्लास्टीक चुंगडीत व डब्यात देशी दारूने भरलेल्या रॉकेट संत्रा कंपनीच्या प्रत्येकी 90 एम.एल.च्या 800 सिलबंद शिशा कि 80,000 रू 4) दारूविक्रीचे नगदी 1,100 रू असा जु.किं. 11,65,100 रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे 1) चंद्रकांत सिमा कळस्कर, रा. गांधी वार्ड क्र 2 नंदोरी, 2) किशोर केषवराव बगडे, वय 40 वर्ष, रा. गांधी वार्ड क्र 2 नंदोरी, यांच्यावर पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, अभिषेक नाईक, विनोद कापसे यांनी केली.
News Today 24 के लिए मोहसिन खान हिंगणघाट