विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम मंद्रूप तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
मंद्रूप दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व पंचायत समिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे , संस्थेचे संस्थापक श्री यल्लाप्पा खंदारे सर, निरंजन ख्याडे ,मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, तालुका क्रीडा सचिव गिरीश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मळसिध्द मुगळे म्हणाले अलीकडच्या काळामध्ये मैदानी खेळांची वाणवा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला जर मनाने कणखर आणि शरीराने मजबूत व्हायचे असेल तर मैदानी खेळाशिवय नाही. असे मत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना विद्यार्थ्यांच्या
आज-काल सगळेच खेळ हे मोबाईल मध्ये खेळले जात आहेत. पण खेळ हे मैदानावर खेळायचे असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराचा पर्यायाने आपल्या बुद्धीचा विकास होतो. यावेळी श्री विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष श्री यल्लाप्पा खंदारे , सुतार सर, साबळे सर, बिराजदार सर, बळीराम कांबळे सर यांच्यासह उपस्थित खेळाडूंचे तालुक्यातील शाळांचे क्रीडाशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर