Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»तामिळनाडूतून मागवलेला फटाक्यांचा ट्रक नगरजवळ ताब्यात .. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    Ahmednagar

    तामिळनाडूतून मागवलेला फटाक्यांचा ट्रक नगरजवळ ताब्यात .. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    newstoday24By newstoday24August 23, 2024Updated:August 23, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तामिळनाडूतून मागवलेला फटाक्यांचा ट्रक नगरजवळ ताब्यात .. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    फटाके मागविणे, बाळगणे किंवा विक्री करण्याचा परवाना नसतानाही तामिळनाडू येथून नगरच्या दोघांनी ट्रकभर फटाके मागितले. दरम्यान, सदर ट्रक नगर तालुका पोलिसांनी कारवाई करून अरणगाव चौक शिवारात पकडला. या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विजय साठे यांनी फिर्याद दिली आहे.

    पुन्नुस्वामी सी चिन्नुपिल्ले (वय 43), भोवनेश्वर आण्णादुराई (वय 22, दोघे रा. विरा कोंडणपट्टी, ता. कड्युर, जि. करूर, तामिळनाडू), किरण संजय खामकर व अमोल संभाजी जाधव (दोघे रा. एमआयडीसी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 10 लाखाचा ट्रक, दोन लाख 43 हजार 524 रूपयांचे फटाके असा 12 लाख 43 हजार 524 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकमध्ये कसल्याही प्रकारे आग विझविण्याचे किंवा सेफ्टी साहित्य न ठेवता फटक्यांची वाहतुक केली जात असल्याचा एक संशयित ट्रक तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अरणगाव चौक येथे पकडला.

    या ट्रकमधील पुन्नुस्वामी सी चिन्नुपिल्ले व भोवनेश्वर आण्णादुराई यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचे फटाके किरण संजय खामकर व अमोल संभाजी जाधव यांनी मागितले असल्याचे समोर आले. खामकर व जाधव यांच्याकडे फटाके मागविण्याचा, बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करून ट्रक व त्यातील फटाके जप्त केले आहेत.सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

    #Ahmednagar #Breaking #rod #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर: शहरात पुन्हा गँगवॉर; घटनेची माहीती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल 
    Next Article अहमदनगर : महिलेची गळा चिरून हत्या… आरोपी पोलिस ठाण्यात दाखल 
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.