गोदावरी नदीला पूर परिस्थिती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अति मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीस पुर परिस्थिती ,तसेच गंगापुर व दारणा धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला.तहसीलदार साहेबांनी जैनपूर येथे येऊन समक्ष पाहणी केली तसेच नेवासा तालुक्यातील जैनपुर,घोगरगाव व इतर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.तसेच तहसिलदार साहेबांनी बोलतानी सांगितले की ,जैनपुर येथे गेल्या ५ वर्षापुर्वी २०१९ ला गोदावरी नदीला महापुरचा सामना करावा लागला होता .
पाण्याचा विसर्ग १ लाखा पर्यंत जातो त्यावेळेस जैनपुर गावास पुर्ण विळखा बसतो.समक्ष जैनपुर गावात नदी काठी येऊन आवाहन केले की ,आपली गुरे व आपण गावातील लोकांनी नदी काठी जाऊ नये असे सांगितले आहे.
न्यूज टुडे 24
प्रतिनिधी रवींद्र लिंबोरे नेवासा