जिल्हा मद्य विक्रेता संघटनेचे साकडे
परभणी,दि.27(प्रतिनिधी) : शहरातील हॉटेल चायना येथे हॉटेल मालकासह कामगारांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेने केली आहे.
जिल्हा मद्य विक्रेता संघटनेच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.27) जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर केले त्याद्वारे, पाथरी रस्त्यावरील हॉटेल चायना या ठिकाणी एका टोळक्याने सोमवारी (दि.26) रात्री हॉटेल चालकासह मध्यस्तीकडे धावलेल्या दोघा ग्राहकांनाही बेदम मारहाण केली. वस्तूंची तोडफोड करीत मोठा धुमाकूळ घातला. या अगोदरही विविध हॉटेल्सवर मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणांमध्ये आरोपींविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी