जमीनीच्या उताऱ्यावर वारसा हक्काची नोंद होत नसल्याने वृद्ध इसमाचे मुलासह शिर्डीत उपोषण.
शिर्डी शहरालगत हेडगेवार नगर गावठाणात आमच्या वारसा हक्काची गट नंबर १४९/१, १४९/२,१४९/३ ,१५०/१,१५०/८१,१५०/८३ अशी कोट्यवधी रुपये किमतीची शिर्डी येथे गावठाणात मध्यवर्ती ठिकाणी जमीन असुन त्या जमीनी संदर्भात राहता कोर्टात जमीनीच्या उतारा वर इतर हक्कात बारकु मारुती शिदे (माळी) असे नाव कागदपत्राच्या आधारे वारस हक्कात लावावे अशी याचिका ११ वर्षापुर्वी दाखल आहे प्रकरण न्यायप्रविष्ट राहता न्यायालयाने लिज पेडंन्सी दुय्यम निबंधक राहता यांनी दाव्याची नोंद करून तलाठी सर्कल शिर्डी कार्यालयाकडे त्याच वेळी पाठवले होते असेअसताना याकडे तलाठी व सर्कल यांनी फेर नंबर २६६८५ मंजूर असताना सातबारा उतारा यावर इतर हक्कात नोद ओढली नाही त्यामुळे न्यायालयाचा अवमान करून जमीनीची खरेदी विक्री होत आहे ती होऊ नये यासाठी व इतर हक्कात नोंद होत नसल्यामुळे व खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने शिर्डी तलाठी व सर्कल यांच्या विरोधात खातेनिहाय चौकशी होऊन दोषी लोकसेवकावर खातेनिहाय कारवाई जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी करावी यासाठी आपण आपण शिर्डी उपविभागीय कार्यालय समोर २६ ऑगस्ट २०२४ पासून उपोषण करत असल्याची माहिती बारकू मारुती शिंदे( माळी) वय ७८ या वृध्द इसमाने दिली असून माझी वडिलोपार्जित जमीन असताना माझ्या वर अन्याय झालेला आहे मीच खरा वारसदार आहे तशी कागदपत्रे वेळोवेळी पुरावे देखील शासकीय यत्रनेला दिली आहे तरी खरेदी विक्री सुरू आहे त्यातून अनाधिक्रृत असलेले मंडळी लाखो रुपयांचा शासकीय लोक सेवकाचे अप्रत्यक्ष पाठबळ घेऊन गैरव्यवहार दहा वर्षापासून सुरू आहे त्यातून कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर उलाढाल झाली आहे म्हणून न्याय मिळत नसल्याने मी हताश झालो आहे माझी परिस्थिती गरिबीची असुन माझी पत्नी देखील आजारी आहे माझी मुले भाऊसाहेब शिंदे व ज्ञानेश्वर शिंदे हे बेरोजगार आहे त्याना बरोबर घेऊन व माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव आदीसह जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण सुरू राहील.
(जालिंदर ढोकणे राहुरी )