दामिनी पथकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमृता भोपळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित
वाळुज, पंढरपूर,बजाजनगर, शेणपुंजी रांजणगाव, वडगाव कोल्हाटी, लिंबेजळगाव, दहेगांव, यांसह विविध भागांमध्ये दामिनी पथकाने जानेवारी २०२४ पासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.यामध्ये अमृता दिलीप भोपळे यांनी मोलाची कामगिरी बजावली त्याबद्दल त्यांचा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते प्रशासकीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, पोलीस अधिकारी नितीन बगाटे, प्रशांत स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. दामिनी पथकाने कामगिरीही कॉलेज शाळा खाजगी क्लासेस कामगार महिलांसाठी उत्कृष्ट ठरत आहे. अनेक बालविवाह रोखून पालकांचे समजूत देखील काढली आहे. दामीनी पथकामार्फत शाळा, कॉलेज, कोचींग क्लासेस येथे भेटी देऊन मुला मुलींना मोबाईलचे दुष्परिणाम, गुड टच बॅड टच, पोक्सो कायदा, महिला विषयक कायदे, डायल ११२, वाहतुकीचे नियमबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली व मुलींना स्वसंरक्षणार्थ कराटेचे प्रशिक्षण दिले. तसेच ११४ असहाय पिडीत महिलांना मदत केली, ३३ टवाळखोर मुलांवर कायदेशीर कार्यवाही केली. १५ वयोवृध्द व ०८ मनोरुग्ण व्यक्तींना मदत केली. १२ बालविवाह रोखले. रेल्वे व बसस्थानक येथे मिळून आलेल्या मुलींना त्यांच्या पालकांचे स्वाधीन केले. अशा प्रकारे दामीनी पथकात उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित कारण करून भविष्यात अशीच उज्वल कामगिरी बजावुन पोलीस खात्याची प्रतिमा उंचावत ठेवाल आशी पेक्ष्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.अमृता भोपळे यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांच्यावरती विविध माध्यमातून शुभेच्छाचा वर्ष झाला. यावेळी सर्व ठाणे प्रभारी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
(प्रतिनिधीः विशाल जोशी गंगापूर)