दिग्रस तालुक्यातील गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने जन जीवन विस्कळीत अनेकांचे संसार उघड्यावर
अति पावसामुळे दिग्रस तालुक्यामध्ये हाहाकार
मागील दोन दिवसापासून सातत्याने रिमझिम सह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे अशातच दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी या गावांमध्ये वनिता मिराशी व संजय शिंदे राहणार शांतीनगर यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक खाद्यपदार्थासह नुकसान झाले आहे व जनजीवन विस्कळीत होऊन संसार पूर्णता उघड्यावर आलाय प्रशासनाने तात्काळ पंचनामा करण्याची मागणी सदर गावकऱ्यांनी केली आहे.
अजित महिंद्रे दिग्रस यवतमाळ