बळीराम इप्पर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.
अंबाजोगाई – बळीराम पांडूरंग इप्पर यांचा ७५ वा अमृत महोत्सव ०८ सप्टेंबर रविवार रोजी शहराच्या नागझरी परिसरातील संत भगवान बाबा मंदीर परिसरात होणार असून या निमित्त्याने दुपारी एक ते तीन या वेळात झी टॉकीज फेम ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून यावेळी मा.राज्यमंत्री पंडीतराव दौंड, अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे,परळीचे माजी सभापती भास्कर चाटे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास खात्याचे कक्ष अधिकारी अच्युत इप्पर,परभणीच्या गुन्हे शाखेचे डीवायएसपी अशोक इप्पर, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, नागझरीचे उपसरपंच उद्धव इप्पर, शेपवाडीचे उपसरपंच पाटलोबा शेप,शेपवाडीचे सरपंच शिवप्रसाद शेप, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गित्ते,माजी सरपंच विष्णूपंत शेप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी बळीराम इप्पर यांच्या अमृत महोत्सव सोहळ्या निमित्तच्या भरगच्च कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पद्मावती ज्वेलर्सचे सुनिल पवार,मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक केशव नागरगोजे,हाडोळी बेल गावच्या सरपंच महानंदा चाटे,नाथराव इप्पर, रामदास शेप,विरकृष्ण अर्बन निधीचे अध्यक्ष बालासाहेब शेप,ऍड.बालाजी इप्पर, गोविंद इप्पर,महिला आयोग सदस्या सविता मुंडे,समस्त इप्पर परिवार व मित्र परिवार आदींनी केले आहे.