स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पो. स्टे. समुद्रपूर हद्दीत NDPS ACT 1985 अन्वये रेड करून आरोपीतांचे ताब्यातुन MD (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ, 2 मोबाईल व चारचाकी वाहन असा एकूण जु. किं. 5,57,760/- रु. चा मुद्देमाल जप्त
दिनांक 01/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथके पोलीस स्टेशन समुद्रपूर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करिता पेट्रोलिंग करित असतांना मुखबिरद्वारे गोपनीय माहिती मिळाली की, नागपूर वरून हिंगणघाट कडे चारचाकी वाहन क्र. एम.एच. 32 ए.एच. 6887 या वाहनाने MD (मॅफेड्रॉन ) अंमली पदार्थ ची वाहतूक करून घेऊन येत आहे. अशा माहिती वरून पो. स्टे. समुद्रपूर हद्दीत शेडगांव फाटा जवळ नाकाबंदी करून आरोपी नामे – 1) यशवंत जगदीश सहारे, वय 27 वर्ष, रा. काजीवार्ड हिंगणघाट, ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा, 2) कु. वैष्णवी वसंतराव घोडमारे, वय 27 वर्ष, रा. न्यू यशवंतनगर हिंगणघाट, ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा, यांना चार चाकी कार क्रमांक एम.एच. 32 ए.एच. 6887 सह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 1) 9 ग्रॅम 44 मिलिग्रँम वजनाची MD (मॅफेड्रॉन) किंमत 37,760/-₹. 2) दोन अँड्रॉइड मोबाईल किंमत 20,000/-रू, 3) एक मारुती सुझुकी स्विफ्ट कंपनीची कार जिचा क्रमांक एम.एच. 32 एम.एच. 6887 किंमत 5,00,000/- असा एकूण जु. किंमत 5,57,760/-रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. आरोपीतांना MD ( मॅफेड्रॉन ) कुठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी आरोपी क्रमांक 3) मंगेश गोपाल भोंगडे, वय 31 वर्ष, राहणार मीठा उमरी तह. हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याने त्यास हिंगणा जिल्हा नागपूर येथून ताब्यात घेऊन तिन्ही आरोपीतां विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन समुद्रपूर हे करीत आहे..
सर्व कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.
मोहसिन खान हिंगणघाट