शेतकऱ्यांना तात्काळ 25000 रुपये हेक्टरी मदत करा ,,,,
दोन दिवसापासून पावसाने घातले थैमान ,शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान,
परभणी: दिनांक 2 सप्टेंबर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात असलेले उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.तर काहींचे घरे सुद्धा पडली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
ऐन बैल पोळाच्या सन असताना बळीराजा वर अस्मानी संकट आल्याने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे म्हणून सरसगट तात्काळ शेतकऱ्यांना 25000हजार रुपये हेक्टरी मदत करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनावर शिवाजी बोचरे ,विकास काकडे,गणेश शिंदे ,शिधेशवर लोखंडे , दत्तराव तरवटे,लक्षमन सुरवसे, माउली पाटील यांच्या सह इतरही शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
प्रतिनिधी राहुल वाहिवळ परभणी.