सावेडी सहकार नगर येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न
सभा मंडपाच्या माध्यमातून धार्मिकता वाढीसाठी मदत – महेंद्र गंधे
नगर : नगरकरांचे अनेक वर्षाचे विकासाचे स्वप्न खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून एक एक पाऊल टाकत शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे. सहकार नगर येथील मोकळ्या जागेत सभा मंडपाचे काम मार्गी लागत असल्यामुळे या परिसरातील नागरिक एकत्र येऊन वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल त्या माध्यमातून धार्मिकता वाढीसाठी मदत होईल, खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहर विकासाची जबाबदारी खऱ्या अर्थाने हाती घेतले आहे, ते सर्वांना बरोबर घेऊन नियोजनबद्ध काम करत आहे. नगर शहरामध्ये सुरू असलेली विकास कामे पाहून आनंद होत आहे. सावेडी उपनगरातील रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे असे प्रतिपादन नगरसेवक महेंद्र गंधे यांनी केले
सावेडी सहकार नगर येथे खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाला. यावेळी नगरसेवक महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रामदास आंधळे, नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेविका सोनाबाई शिंदे,नगरसेविका आशाताई कराळे, भाजप महिला शहर अध्यक्षा प्रिया जानवे, माजी नगरसेवक नितिन शेलार, माजी नगरसेवक तायगा शिंदे, बाबासाहेब सानप, सतीश शिंदे, करण कराळे, इंजि. धनंजय तागडे, बाळासाहेब कुलकर्णी, शशांक कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, अमित गटणे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते,
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, खड्डे मुक्त शहराची ओळख पुसण्यासाठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहराच्या वैभवात व सौंदर्यकरणात भर पडावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला आहे, शहराच्या विस्तारीकरणाला शहराच्या चारही बाजूने बायपासची निर्मिती होत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे ते म्हणाले