सोलापूर रोड कानडे मळा सी. एस.आर. डी कॉलेज पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी
सारसनगर कानडे मळा परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता – आ. संग्राम जगताप
नगर : शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्याची कामे मार्गी लागावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या निधी मंजूर करून घेतला असून टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध व कायमस्वरूपाची दर्जेदार रस्ता कॉंक्रिटीकरण्याची कामे मार्गी लागत आहे माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी सोलापूर महामार्ग कानडे मळा ते सीएसआरडी कॉलेज पर्यंत रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केला आहे तसेच भिंगार नाल्यावर आरसीसी पुलाचे काम मार्गी लागणार आहे तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी आरसीसी गटार तयार करण्यात आली आहे, या रस्त्याच्या विकास कामासाठी सुमारे ११ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, पुढील ५० वर्षाचा विचार करून शहरातील विकासाची कामे मार्गी लावली जात आहे, सारसनगर कानडे मळा परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता असून या भागाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे शहराच्या वैभववात भर पडेल असा रस्ता निर्माण होत आहे कानडे मळा परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी सहकार्य केले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
मनपाचे माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सोलापूर महामार्ग कानडे मळा ते सीएसआरडी कॉलेज पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, जालिंदर कोतकर, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी सहप्रभागातील नागरिक उपस्थित होते
माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले म्हणाले की, कानडे मळा सारसनगर परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागत आहे या परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू असून अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहे प्रभाग ११ च्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असल्याने प्रभागातील टप्प्याटप्प्याने विकास कामे मार्गी लागत आहे, असे ते म्हणाले.