अहमदनगर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी यांचा मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे नवनिर्वाचित जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी शेख अशपाक कंकरसहाब यांचा मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेच्या वतीने सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष शहानवाज खान समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव अथर खान, मुख्याध्यापक शाकेर जनाब, प्राध्यापक अझहर खान, डॉ उमेर खान, मौलाना खिजर खान, जव्वाद शेख,नसीर सय्यद, मझहर खान आदी उपस्थित होते. मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहानवाज खान म्हणाले की, जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उर्दू शाळेमध्ये योग्य त्या शासनाच्या सुविधा देऊन उर्दू शाळा देखील डिजिटल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सत्काराला उत्तर देत जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी अशपाक शेख म्हणाले की, जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शाळेचा स्थर कसे उंचावता येईल यासाठी प्रयत्न केले जातील तसेच जिल्ह्यातील उर्दू शाळा डिजिटल करण्याचे आश्वासन दिले..