अहमदनगर : नागरिकांचा मुद्देमाल भंगारात विकून वाहतूक पोलीस होताहेत मालेमाल
वाहतूक पोलीसांचा अजब कारभार, पण यासाठी कोणाचा आहे त्यांना आधार ?
वाहतूक पोलिसांनीच घातला घाट, नागरिकांच्या मुद्देमालाची परस्पर लावली विल्हेवाट
गोरगरिबाच्या मालमत्त्यावर वाहतूक पोलिसांचा डल्ला, कोणी दिला त्यांना हा सल्ला…
अहमदनगर शहरातील गुन्हेगारी रोखणे, चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी असली तरी आपले कर्तव्य बजावत असताना पोलिस अजब कारभार करत असल्याचा प्रकार नगर शहरात पाहायला मिळत आहे, नगर शहरात चोरटे चोरीच्या कामासाठी वाहनांची चोरी करतात, बऱ्याचदा चोरटे चोरी केलेल्या वाहनाचे स्पेअरपार्ट काढून विकत असल्याचे आपल्याला माहीतच आहे, पण अशा चोरट्यांवर कारवाई करून त्या चोरट्यांच्या ताब्यातील चोरीची वाहने आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत जप्त केलेल्या वाहनांबाबत वाहतूक पोलीस मनमानीपणे अजब कारभार करत असल्याचे दिसून येत आहे,
अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे आणि नगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून जप्त केलेली वाहने जिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या पटांगणात लावली होती मात्र जिल्हा रुग्णालयाने ती वाहने तेथून काढून घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याने तोफखाना पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील ती कारवाईची वाहने तोफखाना पोलीस ठाण्यात नेली, मात्र नगर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतील त्यांच्या ताब्यातील वाहनांची वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कोणालाही काही न विचारता, तसेच त्या वाहनांच्या मूळ मालकांना काही पूर्व सूचना न देता, त्या वाहनांचा लिलाव न करता मनमानीपणे ती वाहने नगर शहरातीलच एका भंगारवाल्याला परस्पर विकल्याचा अजब प्रताप केल्याचे पहायला मिळत आहे ….
नगर वाहतूक शाखेचे पोलीस हे परस्पर जप्त केलेल्या वाहनांची विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार नगर शहरात घडला आहे. कारवाईत ताब्यात घेतलेली वाहने वाहतूक पोलिसांनी परस्पर भंगार मध्ये विकल्याचा समोर आले असून यावरून नगर वाहतूक पोलिसांचा अजब कारभार पाहायला मिळत आहे,
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाईत जप्त केलेली अनेक वाहने लावण्यात आली होती त्यामधील अनेक वाहनांची नगर वाहतूक पोलिसांनी विल्हेवाट लावली. ती वाहने भंगारवाल्याला विकून आलेले पैसे हे वाहतूक पोलिसांनी स्वत:च्या खिशात घालत असल्याचे बोलले जात आहे, भंगारवाल्याला हाताशी धरत पोलीस चालवतात अशी चाल यामुळे नागरिकांचे होताहेत मोठे हाल… पण याकडे वरिष्ठ पोलीस डोळेझाक का करताहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे,
गोरगरिब नागरिकांचा भंगारात विकतात मुद्देमाल ; अन् पोलीस होताहेत मालामाल.. पोलिसांनीच घातला घाट, नागरिकांच्या मुद्देमालाची परस्पर लावतात विल्हेवाट… असे म्हणावे लागेल. स्वार्थापायी वाहतूक पोलीस त्या वाहणांची परस्पर विल्हेवाट लावत आहे त्यामुळे नगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नगर वाहतूक पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा धाक राहिला नाही का ? तसेच या पोलिसांना गोरगरिबाच्या मालमत्त्यावर डल्ला मारण्याचा सल्ला कोणी दिला ? कारवाईत जप्त केलेली वाहने परस्पर भंगारात विकण्याचा, विल्हेवाट लावण्याचा वाहतूक पोलीस निरीक्षक आणि पोलिसांना कोणी आदेश दिला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी असा प्रताप करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबतच त्या भंगारवाल्याची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आणि हा प्रताप करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना नेमकी कोणाची साथ आहे याचा देखील तपास लावणे गरजेचं आहे
तसेच मनमानी कारभार करणाऱ्या नगर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय आणि कधी कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.